Posts

#२ - लहानपणीची एसटी

टीन टीन...... माझा पहिल्या ब्लॉगमध्ये मी आपल्याला माझ्या विषयी अर्थातच रोहित दादासाहेब धेंडे विषयी अगदीच थोडक्यात माहिती दिली. या ब्लॉगमध्ये मी माझ्या एसटीप्रेमाचा हा प्रवास नेमका कसा सुरु झाला, त्याविषयी लिहिणार आहे.           बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे माझे पाय नेमके कश्याप्रकारे दिसले होते हे मी माझा घरच्यांना कधीच विचारले नाही, पण एसटीची ही आवडत जेव्हापासून वृद्धिंगत झाली, तेव्हापासून मात्र घरच्यासोबत बोलणे अगदीच मोकळेपणाचे झाले, अर्थातच माझा या छंदाला, प्रेमाला बहरण्याचे काम देखील त्यांनीच केले हे विशेष ! इतर पोरांप्रमाणे मला देखील लहानपणापासून गाड्यांची हौस प्रचंड ! त्यातल्या त्यात ट्रक , बस अश्या मोठ्या गाड्यांवर विशेष प्रेम ! बाहेर फिरायला वगैरे जाताना रस्त्यावरून जाताना कोणती मोठी गाडी दिसली, की पुष्कळ आनंद व्हायचा, त्यामुळे फिरणे हा विषय लहानपणापासून आवडीचा बनला. फिरायला गेलो, की गाड्या दिसतात हे समीकरण अगदीच घट्ट मनात रुजले होते. रिक्षा किंवा बसमधून प्रवास होताना सिग्नलवर उभ्या असणाऱ्या वाह...

#१ - अवलिया प्रवासी !

Image
लहानपणापासून व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा  छंद  असतो , आवड असते , विशिष्ट क्षेत्रात प्रचंड रुची असते आणि तीच गोष्ट त्या व्यक्तीचे आयुष्य सुखकर पणे जगण्यास कारणीभूत ठ रते . छंदाच्या या नानाविध प्रकारात अनेक गोष्टी दडल्या आहेत, त्यातील जवळपास सर्वांची आवडती गोष्ट म्हणजे फिरणे. फिरायची आवड कुणाल नसते हो . प्रत्येकाला फिरण्याची , भटकण्याची आवड असते , किंबहुना या भटक्या प्रवृत्तीतून अनेक भटके प्रसिद्ध देखील झाले आहेत आणि त्याच्या विशिष्ट शैलीतून ते आपल्याला अनेक नव्या - जुन्या ठिकाणांची सफर देखील घडवत आहेत. अशीच फिरायची , बागडायची , नव-नवीन ठिकाणे धुंडाळून काढायची आवड मला देखील लहानपणापासूनच , पण मी केलेल्या या सर्व भ्रमंतीमध्ये माझे प्रवासाचे  माध्यम मात्र हटके होते आणि ते अनोखे माध्यम म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी अर्थातच आपली लाडकी एसटी ! होय ! मी एसटीबद्दलच बोलतोय.  तीच एसटी जी महाराष्ट्राच्या प्रवासी वाहतुकीचा क णा म्हणून ओळखली जाते.   तीच एसटी जी महाराष्ट्रा ची नाळ म्हणून ओळखली जाते  आणि तीच एसटी जी ‘ लालपरी ’ म्हणू...